Hukkeri

Draupadi Murmu Presidential Candidate : द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारीचा निर्णय स्वागतार्ह : प्रमोद मुतालिक

Share

एनडीएने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड केल्याचा निर्णय स्वागतार्ह आहे अशी प्रतिक्रिया श्रीराम सेनेचे संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी दिली.

श्रीराम सेनेच्या हुक्केरी शहर आणि तालुक्याच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना संस्थापक प्रमोद मुतालिक यांनी अधिकारपत्र प्रदान केली. त्यानंतर ईश्वरलिंग देवस्थानात झालेल्या सभेत बोलताना मुतालिक म्हणाले, संघटनेत पद केवळ नावापुरती असते. सर्वानी जबाबदारीने काम करून संघटना पुढे न्यायची असते असे आवाहन त्यांनी केले. बाईट

त्यानंतर बोलताना प्रमोद मुतालिक म्हणाले, आदिवासी समाजाच्या एका महिलेला राष्ट्रपती पद बहाल करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केन्दिरी गृहमंत्री अमित शहा यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. यामुळे देशातील आदिवासी, जंगल भागात राहणाऱ्या लोकांचा विकास होण्यास मदत होणार आहे. काँग्रेसच्या नेहरू कुटुंब मर्यादित राजकारणाचा, प्रशासनाचा वाईट अनुभव घेतलेल्या आदिवासी समाजाला भाजपकडून सन्मानाचे पद देण्यात येतेय हे स्वागतार्ह असल्याचे त्यांनी सांगितले. बाईट

यावेळी विवेक पुराणिक, संघटनेचे नूतन पदाधिकारी महावीर सोलापुरे, सिद्धू नाईक, विठ्ठल हेगडे, राहूल अंकले, मारुती बेन्नाडी, युवराज बेनाडीकर आणि सचिन कुंबार आदी उपस्थित होते.

 

 

Tags: