बेळगाव उत्तर मतदार संघातील 14 ठिकाणी केएलई संस्था आणि अनिल बेनके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आरोग्य तपासणी शिबिरांची सुरुवात आज रुक्मिणी नगर येथे उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आली. फ्लो
या आरोग्य तपासणी शिबिरात सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, नेत्र, त्वचा, कान, नाक, घसा, रक्तदाब, मधुमेह, श्वास कोशाशी संबंधित अनेक रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. 
यावेळी बोलताना आ. अनिल बेनके यांनी, पुढील आठवड्यात चव्हाट गल्ली, त्या पुढील आठवड्यात सदाशिवनगर हनुमान नगर नेहरू नगर रामतीर्थ नगर भांदुर गल्ली यासह अनेक उत्तर मतदार संघातील 14 ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या आरोग्य तपासणी शिबिरांचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी बोलताना मल्लिकार्जुन शिरगुप्पी शेट्टरु यांनी, शिबिरांच्या संयोजनाबाबत समाधान व्यक्त करून केएलई संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे आणि आ. अनिल बेनके यांचे आभार मानले. बाईट
यावेळी नगरसेवक अफझलखान पठाण, राजू डोणी, श्रेयस नाकाडी, लक्ष्मी नायक, शहर गट शिक्षणाधिकारी रवी बजंत्री, रुक्मिणीनगर सरकारी शाळेचे मुख्याध्यापक आर. एच. अळवणी आदी उपस्थित होते.


Recent Comments