अनुसूचित जाती–जमातीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून अखिल भारत कर्नाटक डॉ. आंबेडकर अनुसूचित जाती–जमाती रक्षण वेदिकेचे राज्याध्यक्ष बी. डी. हिरेमठ यांच्यावर जातिनिंदेचा खोटा गुन्हा दाखल केसाच्या निषेधार्थ येत्या 30 जून रोजी बेंगळुरातील फ्रीडम पार्कवर सत्य प्रतिपादन सत्याग्रह करण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हाध्यक्ष बसलिंगय्या चिक्कमठ यांनी दिली.

शुक्रवारी बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना बसलिंगय्या चिक्कमठ म्हणाले, राज्यात जंगम समाजाची सुमारे 40 लाख लोकसंख्या आहे. आम्हाला मिळवायच्या घटनात्मक अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. काही स्वार्थी राजकारण्यांकडून राजकीय, जातीय हेतूने आम्हाला मिळायच्या आरक्षण व अन्य सुविधांपासून अधिकारांचा गैरवापर करून दूर ठेवण्यात येत आहे.
याच्या विरोधात तसेच बेडजंगम समाजाला सुविधा, आरक्षण मिळावे या मागणीसाठी येत्या 30 जून रोजी बेंगळुरातील फ्रीडम पार्कवर सत्य प्रतिपादन सत्याग्रह करण्यात येणार आहे. या आंदोलनाला सर्व स्वामीजींनी पाठिंबा दिला आहे. एक लाखाहून अधिक लोक यात सहभागी होणार आहेत असे त्यांनी सांगितले. बाईट यावेळी ए. आर. चिक्कमठ, श्रीकांतय्या कुलकर्णी, महांतेश पुजारी आदी उपस्थित होते.


Recent Comments