Belagavi

Dog birthday celebrated in tukkanatti village : राजकीय विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी तुक्यानट्टीत कुत्र्याचा धुमधडाक्यात वाढदिवस

Share

आपल्या राजकीय विरोधकांना प्रत्युत्तर असेही दिले जाऊ शकते का? सुमारे 5 हजार लोकांना 3 क्विंटल चिकन  आणि 1 क्विंटल अंडी आणि शाकाहारींना 50 किलोच्या काजुकरीचे जेवण घालून पाळीव कुत्र्याचा वाढदिवस धुमधडाक्यात करून या अवलियाने आपल्या विरोधकांना उत्तर देत संपूर्ण कर्नाटकात विक्रम केला आहे. याबाबत पेश आहे हा एक स्पेशल रिपोर्ट !

होय, तुम्ही हे जे दृश्य पाहताय ते साध्यासुध्या जेवणावळीचे नाही. येथे तब्बल 5 हजार लोकांना सामिष भोजन वाढले जातेय. त्यासाठी चक्क 3 क्विंटल चिकन आणि 1 क्विंटल अंड्यांचा स्वयंपाक करण्यात आलाय. शाकाहारींसाठीही वेगळा खास मेन्यू आहे बर का ! त्यांच्यासाठीही खास 50 किलोची काजुकरी बनवली आहे. हा एवढा सगळा जामानिमा का? कारण आहे एका पाळीव कुत्र्याचा वाढदिवस. या सगळ्यातून आपल्या राजकीय विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी एका व्यक्तीने ही सगळी चकित करणारी मेजवानी आयोजिली आहे. ऐकूयात याचे कारण आयोजकांच्याच तोंडातून..

अशा तर्हेने आपल्या विरोधकांना उत्तर देणारी ही असामी कोण म्हणताय? अहो ते दुसरे कोण नव्हेतर बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील तुक्यानट्टी गावचे शिवाप्पा यल्लाप्पा मर्डी आहेत. आपला लाडका पाळीव श्वान क्रिश याच्या वाढदिनानिमित्त त्यांनी हा धुमधडाका केलाय. याचे कारण ऐकूयात त्यांच्याच शब्दांत.

या गावजेवणापूर्वी क्रिशची गावातून वाहनातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर चक्क 1 क्विंटल वजनाचा भव्य केक क्रिशने कापला. उपस्थित शेकडो लोकांना तो वाटण्यात आला. एवढेच नाही तर रात्री गावकऱ्यांसाठी संगीत रजनी कार्यक्रमही पार पडला.  एवढा पैसे ख्रहक करून, पाळीव कुत्र्याचा धुमधडाक्यात वाढसीव्हीसी साजरा करण्यामागचे कारणही रंजक आहे.  काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या तुक्यानट्टी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सदस्यांनी आधीच्या सदस्यांचा अवमान केल्याचे ते कारण. शिवाप्पा यल्लाप्पा मर्डी आणि अन्य सदस्यांनी गेल्या २० वर्षांत पंचायत सदस्य म्हणून गावात अनेक सुधारणा केल्या. विकास केला. आताच्या सदस्यांप्रमाणे मोबाईलवर स्टेटस न ठेवता, लोकांच्या मनात स्टेटस निर्माण केले. आमचा अवमान करणाऱ्या नव्या सदस्यांची  कुत्र्याएवढीही लायकी नाही. त्यांच्यापेक्षा आमच्या घरात पाळलेला क्रिश श्वानही त्यांच्याहून अधिक मौल्यवान आहे. म्हणूनच त्यांना त्यांची लायकी दाखवून देण्यासाठी आम्ही क्रिशचा वाढदिवस असा भव्य पद्धतीने साजरा केलाय असे शिवाप्पा मर्डी यांनी सांगितले. बाईट

यापुढील दिवसात आणखी भव्य प्रमाणात असे उपक्रम राबविण्याचा मनोदयही मर्डी यांनी व्यक्त केलाय. काहीही असले तरी आपला वाढदिवस अशा थाटामाटात साजरा करण्याचे भाग्य लाभलेला क्रिश देखील नशिबवानच म्हणायला हवा. त्याचा हा आगळावेगळा वाढदिवस पाहण्यासाठी तुक्यानटीसह आसपासच्या गावकऱ्यांनीही गर्दी करून जेवणावळीचा लाभ उठवला हे विशेष.

 

 

 

Tags: