ठोस साक्षी–पुराव्यांच्या अभावी कुवेम्पूनगर तिहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी प्रवीण भट याची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याची माहिती त्याचे वकील प्रवीण करोशी यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली.

ऍड. प्रवीण करोशी म्हणाले, १६ ऑगस्ट २०१५ रोजी कुवेम्पूनगरात झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी प्रवीण भटला १७ ऑगस्टला अटक करून त्याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार बेळगावातील दुसऱ्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुमारे अडीच वर्षे खटला चालला. सुनावणीत पोलिसांनी सुमारे १५ ते २० साक्षी सादर केल्या. पोलिसांनी केवळ परिस्थितीजनक पुरावे सादर केले, ठोस पुरावे सादर केले नाहीत म्हणून न्यायालयाने संशयिताला २०१८मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. त्याची सुनावणी करून न्या.
मुदगल आणि न्या. कमल यांच्या पीठाने आरोपीविरोधात ठोस पुरावे पोलिसांनी सादर केलेले नाहीत या कारणावरून २१ जून रोजी संशयित प्रवीण भट याची निर्दोष मुक्तता केली आहे. या आदेशानुसार, प्रवीण भट याची २१ जून रोजी रात्री ८ वाजता कारागृहातून सुटका करण्यात आली आहे असे ऍड करोशी यांनी सांगितले.


Recent Comments