Jolle Couples elder son marriage

चिक्कोडीचे खा. अण्णासाहेब जोल्ले आणि धर्मादाय, हज आणि वक्फ खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांचे ज्येष्ठ पुत्र ज्योतिप्रसाद यांचा महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील प्रियांका पाटील यांच्याशी विवाह झाला. निपाणी तालुक्यातील भिवशी येथे हा विवाहसोहळा पार पडला.
अण्णासाहेब जोल्ले, शशिकला जोल्ले, त्यांचे कनिष्ठ पुत्र बसवप्रसाद जोल्ले, कुटुंबीय, आप्त, मित्रमंडळी, जिल्ह्यातील अधिकारी, विविध संघ-संस्थांचे पदाधिकारी आणि मठाधीशांच्या उपस्थिती जोल्ले यांच्या घरासमोर उभारलेल्या मांडवात सध्या पद्धतीने हा सोहळा पार पडला. यावेळी जोल्ले कुटुंबियांचे नातेवाईक, समर्थक व भाजप कार्यकर्ते आदींनी उपस्थित राहून नवदांपत्याला आशीर्वाद दिले. 


Recent Comments