वन विभागाकडून होणार त्रास रोखण्याची आणि बीट रेंज अधिकारी मुरगोड यांची तालुक्यातून बदली करण्याची मागणी महिला काँग्रेस अध्यक्ष अनिता दंडगल यांनी केली आहे.

खानापूर तालुक्यातील मोदेकोप्प, ओतोली, कानसोली भागात फॉरेस्ट रेंज ऑफिसरकडून जनतेला त्रास दिला जात आहे. शेतवाड्यातील झाडांच्या फांद्या तोडल्यावर त्रास दिला जात आहे. आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी मंजूर करवून घेतलेले रस्ते बनविण्यातही विलंब करण्यात येत आहे.
त्यामुळे बीट रेंज अधिकारी मुरगोड यांची तालुक्यातून बदली करायला हवी. ते प्रत्येक कामासाठी पैशाची मागणी करीत आहेत. यांच्या या धोरणाने येथील गरीब शेतकरी समस्यांचा सामना करीत आहेत. जर त्यांची लवकरात लवकर बदली नाही केली तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments