खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथे आयोजित केलेला बालविवाह माहिती मिळताच महिला व बाल कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत रोखल्याची घटना घडली.

होय, बेळगाव तालुक्यातील कोंडसकोप्प गावातील १६ वर्षे ७ महिने वयाची बालिकेचा बालविवाह खानापूर तालुक्यातील हेब्बाळ येथील २८ वर्षांच्या म्हात्रु गुरव याच्याशी ठरविण्यात आला होता. काल, मंगळवारी हा विवाह लावून देण्यात येणार होता. लग्नाची सर्व तयारी करण्यात आली होती. केवळ अक्षता पडणे तेवढे बाकी होते. तोपर्यंत याची माहिती मिळताच संबंधित सरकारी अधिकारी, तलाठी, अंगणवाडी कर्मचारी पोलीस फौजफाट्यासह विवाहस्थळी दाखल झाले. त्यांनी बालविवाह रोखून अल्पवयीन बालिकेचे रक्षण केले. त्यानंतर मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिचा विवाह करणार नाही असे प्रतिज्ञापत्र पालकांकडून लिहून घेऊन तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले अशी माहिती महिला व बाल कल्याण खात्याच्या सूत्रांनी दिली.


Recent Comments