Hukkeri

‘७७७ चार्ली’तील ब्रूनोप्रमाणे वागतोय श्वान !

Share

सध्या श्वानप्रेमाच्या बाबतीत७७७ चार्लीहा कन्नड चित्रपट चांगलाच गाजतोय. या चित्रपटातील ब्रुनो या श्वानाप्रमाणेच हुक्केरीत एक श्वान वागून सर्वांचे लक्ष वेधून घेतोय.

होय, सध्या सगळ्यांच्याच तोंडी ७७७ चार्ली या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. पण केवळ माणूसच नव्हे तर श्वानदेखील हा चित्रपट पाहून ब्रूनोचे फॅन झालेत. हुकेरीतील दिवंगत पत्रकार चामराज पाटील यांचे पुत्र विनय पाटील यांनी पाळलेला कुत्रा ब्रूनोचा फॅन बनलाय. टीव्हीवर चार्ली चित्रपटाचा ट्रेलर, इंटरव्ह्यू लागताच पाटील यांचा हा पाळीव कुत्रा पळत टीव्हीपुढे येतो, पाय उंचावत टीव्ही स्क्रीनकडे जाऊन भुंकत बोलण्याचा प्रयत्न करतो. प्राण्यांनाही प्रेम, लळा लावल्यास ते सुद्धा स्नेह व्यक्त करतात हेच यातून दिसून येते. 

 

 

 

Tags: