ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांच्या शिक्षणाची गैरसोय होऊ नये याची काळजी संकेश्वर दुरदुन्डेश्वर विध्यावर्धक संघ घेत असल्याचे संघाच्या पदवीपूर्व महाविद्यालयाचे उपाध्यक्ष विनय पाटील यांनी दिली.

पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवलेल्या कॉलेजच्या विध्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज कॉलेजमध्ये पार पडला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, एसडीव्हीएस संघाच्या पदवीपूर्व कॉलेजचा निकाल ९८% लागला आहे. ही अभिमानाची बाब आहे. विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संघातर्फे यापुढेही असेच सहकार्य संचालक मंडळ देईल असे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष विनय पाटील आणि संचालक मलगौडा पाटील यांचा सत्कार करून बोलताना प्राचार्या सर्वमंगला यरगट्टी म्हणाल्या, सीमाभागातील विध्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधी मंगळूर किंवा दक्षिण कर्नाटकातील शिक्षण संस्थांकडे जावे लागत होते. मात्र माजी मंत्री ए. बी. पाटील आणि संचालकांमुळे आज संकेश्वरातच शिक्षण मिळण्याची सोय उपलब्ध झाली आहे.
यानंतर प्रतिभावान विध्यार्थी सानिया मुल्ला, पार्वती डोळन्नावर, अश्विनी, गजानन केसती यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी विध्यावर्धक संघाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे विध्यार्थी, पालक, कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments