विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य रोजंदारी कर्मचारी महासंघाच्या वतीने आज बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून मुख्यमंत्र्यांच्या नावचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

होय, बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज कर्नाटक राज्य रोजंदारी कर्मचारी महासंघाच्या वतीने विविध 24 मागण्या पूर्ण करण्याचा आग्रह करून निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून मागण्या पूर्ण करण्याचा आग्रह धरला. फ्लो यावेळी निदर्शकांना उद्देशून बोलताना निदर्शकांच्या नेत्यांनी, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करून राज्यातील सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी केली.
नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे रोजंदारी कर्मचाऱ्यांनाही सगळ्या सोयी-सुविधा द्याव्यात, कर्नाटक रोजंदारी कामगार अधिनियम 2012 प्रमाणे रोजंदारी कर्मचाऱ्यांना रिक्त पदी नेमणूक करावी, त्यांना 100% महागाई भत्ता द्यावा, घरभाडे भत्ता द्यावा आदी मागण्या त्यांनी केल्या. बाईट यावेळी के.एस.शर्मा, एस.एल. सुगावी, एल. एस. सनदी, राजेंद्र कल्लुर, रवी भजंत्री, प्रशांत मुद्दी, सुमित्रा शेटके, रत्ना तुप्पद आदी रोजंदारी कामगार उपस्थित होते.


Recent Comments