Belagavi

नुपूर शर्मा, जिंदाल यांना अटक करा : मुस्लिम जमात 

Share

इस्लाम धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांची अवहेलना केलेल्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करण्याची मागणी बेलगाम मुस्लिम जमात आणि मौलवींनी केली आहे.

बेळगावात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना . भाजप नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. त्याच्या विरोधात देशभरात आंदोलने सुरु आहेत. भाजपने या दोन्ही नेत्यांना पार्टीतून फक्त बडतर्फ केले आहे.  पण त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली नाही. घटनेनुसार या नेत्यांवर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

मौलवी मुफ्ती मंजूर आलम म्हणाले, देशात सर्वांना आपले हक्क चालविण्याची संधी दिली आहे. पण येथे काहीजण धार्मिक भावना दुखाविण्याचे काम करत आहेत. अन्य देशात भारतातील सर्वधर्म आणि सौहार्दतेबद्दल चर्चा होते. पण आता देशातील वातावरण बदलत चालले आहे.  मोहम्मद पैगंबरांविषयी अवहेलना करणाऱ्या दोन्ही नेत्यांना पार्टीतून फक्त बडतर्फ केले आहे. पण त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.

 

 

Tags: