Belagavi

गौंडवाड हिंसाचार प्रकरणी आणखी तिघांना अटक

Share

बेळगाव तालुक्यातील गौंडवाड गावातील सतीश पाटील या युवकाचा खून आणि नंतर उसळलेल्या हिंसाचारप्रकरणी आणखी तिघा आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणी अटक केलेल्या एकूण आरोपींची संख्या ३२ झाली आहे.

शनिवारी, १८ जून रोजी रात्री गौंडवाड येथे सतीश पाटील या युवकाची पार्किंगच्या वादातून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता. संतप्त जमावाने ६ हून अधिक वाहने जाळून, गवतगंज्या पेटवून दिल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी आणखी तिघांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणी अटक केलेल्यांची एकूण संख्या ३२ झाली आहे.

काकती पोलिसांनी या प्रकरणी आनंद कुट्रे (वय ६०), जायप्पा निलजकर (वय ५२), सुरेखा निलजकर (वय ४७), संजना निलजकर (वय २१). व्यंकटेश कुट्रे (वय ५०), दौलत मुतगेकर (वय २१), लखन निलजकर (वय २५), लक्ष्मी कुट्रे (वय ४५), संगीता कुट्रे (वय ४५), शशिकला कुट्रे (वय ५०) आदींना अटक केली आहे. हे सर्व गौंडवाड गावचे रहिवासी आहेत. काकती पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Tags: