हुक्केरीतील नव्या बसस्थानकातून बस सेवेला वन तसेच अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते चालना देण्यात आली.

हुक्केरीत नव्याने बांधलेल्या बसस्थानकाचे काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले होते. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तेथून बससेवा सुरु होऊ शकली नव्हती. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत होते. याची दखल घेऊन मंत्री उमेश कत्ती यांनी परिवहन मंडळ अधिकाऱ्यांना डेपोमधून तातडीने बससेवा सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सुरु केलेल्या बससेवेचे मंत्री कत्ती यांच्याहस्ते निशाण दाखवून उदघाटन करण्यात आले. 
त्यानंतर हुक्केरी डेपोच्या आवारात वृक्षारोपण करून बोलताना मंत्री उमेश कत्ती म्हणाले, हुक्केरी डेपोतून स्थानिक गावे आणि दूरवरच्या गावांसाठी बससेवा सुरु करण्यात आली आहे. त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. २ बसडेपो असलेला हुक्केरी मतदार संघ राज्यात एकमेव आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी चिक्कोडी विभागीय नियंत्रणाधिकारी शशिधर एम., डेपो मॅनेजर विजय कागवाडे, सुरक्षा अधिकारी अजित होसट्टी, लेख अधिकारी शंकर घोडसे, हुक्केरी नगराध्यक्ष ए. के. पाटील, उपाध्यक्ष आनंद गंध, परगौडा पाटील, रायप्पा डुग, मोशीन इनामदार, महांतेश कोळी आदी उपस्थित होते.


Recent Comments