श्री श्री १००८ श्री उत्तरादी मठाचे सत्यात्मतीर्थ श्रीपाद स्वामींच्या उपस्थितीत अथणीतील भोजराज क्रीडांगणावर आज योगसाधना करून जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.

अथणीचे आ. महेश कुमठळ्ळी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर प्रांत संचालक अरविंदराव देशपांडे आंतरराष्ट्रीय योगदिन समारंभात उपस्थित होते. योगगुरू एस. के. होळप्पनावर, डॉ. विनय चिंचोळीमठ यांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली. त्यानुसार उपस्थितांनी योगसाधना केली. जे. ए. कॉलेज आणि हायस्कूल व पदवी विभागाच्या शिक्षक, विद्यार्थ्यांनी तसेच योगप्रेमींनी या योगदिन कार्यक्रमात भाग घेतला. 


Recent Comments