भारतीय योगाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळाली आहे. प्रत्येकाने योगसाधना करून उत्तम आरोग्य प्राप्त करावे असे आवाहन चिक्कोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केले.

निपाणीजवळील श्रीपेवाडीतील जोल्ले उद्योग समूहाच्या सीबीएसई शाळेच्या मैदानावर मंगळवारी सकाळी आंतरराष्ट्रीय योगदिन पाळण्यात आला. यावेळी उपस्थितांना मर्हदर्शन करताना खा. अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, नियमित योगसाधना केल्याने तंदुरुस्त आरोग्यासह मनाला शांती मिळून ताण-तणावापासून दूर राहण्यासही मदत मिळते. त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगसाधना करावी असे आवाहन त्यांनी केले. 
यावेळी पतंजली योगपीठाचे राज्याध्यक्ष बाबुलाल आर्य म्हणाले, जीवनात प्रत्येक कार्यात यश मिळवायचे असेल तर मन आणि आरोग्य स्वस्थ असले पाहिजे. योगामुळे या दोन्ही गोष्टी साध्य होतात. त्यामुळे प्रत्येकाने थोडा वेळ काढून रोज योग केला पाहिजे. निपाणीत जोल्ले दांपत्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात योगदिन आयोजित केला हे प्रशंसनीय आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी मंचावर चिक्कोडी प्रांताधिकारी संतोष कामगौडा. एडीएच ओ डॉ. एस. एस. गडेद, डीवायएसपी बसवराज एलीगार, हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, बिरेश्वर सोसायटीचे चेअरमन जयानंद जाधव, तहसीलदार मोहन भस्मे, प्रगतीपर शेतकरी शिवमूर्ती पडलाळे, ऍड. अशोक हरगापुरे, भाजपचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजेश नेर्ली आदी उपस्थित होते


Recent Comments