हुक्केरी शहरात ४ दिवसांपूर्वी ६ घरफोड्या करून चोरी केलेल्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात हुक्केरी पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीचा ऎवजही जप्त करण्यात आला आहे.

होय, हुक्केरी शहरात ४ दिवसांपूर्वी ६ घरफोड्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे एकच खळबळ माजली होती. या प्रकरणांचा छडा लावून तातडीने आरोपींच्या हुक्केरी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या साखळी चोऱ्या करून लुटलेला सुमारे ४८ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि ५ हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी तलाठ्याच्या घरातील चोरी, म्हशी आणि जनावरे चोरी तसेच अवैध गांजा विक्रीप्रकरणातील आरोपीना हुक्केरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका प्रकरणात चोरी झालेल्या चर्च दिवसात आरोपीना अटक करून सोन्याची १ बोरमाळ, १ मंगळसूत्र, सोन्याची कर्णफुले तसेच चांदीचे पैंजण आणि ५ हजार रुपये रोख असा एकूण ४८ हजारांचा चोरलेला मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे.
हुक्केरीचे सीपीआय एम. एम. तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सिद्रामप्पा उन्नद, एल. एल. पत्तेन्नावर, ए. एस. सनदी, एएसआय व पोलीस कर्मचारी सी. डी. पाटील, आर. एस. ढंग, मंजुनाथ एस. कब्बूर, उमेश अरभावी, ए. एल. नाईक, एम. के. अत्तार आदींनी या कारवाईत भाग घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामगिरीबद्दल हुक्केरी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.


Recent Comments