Khanapur

पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी माता भाकतेय देवाकडे करुणा 

Share

डॉक्टरांचे दरवाजे बंद झाल्यावर असहाय्य मातेने आपल्या आजारी मुलाला घेऊन देवाचे दार ठोठावल्याची मन हेलावून सोडणारी घटना खानापूर तालुक्यातील नंदगड येथे घडली आहे.

होय, खानापूर तालुक्यातील नंदगड हे एक ऐतिहासिक गाव आहे. गावाच्या पश्चिमेला एका टेकडीवर ऐतिहासिक पवित्र क्रूस (क्रॉस) आहे. अनेक भक्त या क्रूसाचे दर्शन घेऊन नवस बोलतात. येथे बोललेले नवस पूर्णही होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे. त्यामुळेच की काय आपल्या ८ वर्षांच्या आजारी मुलाला वाचविण्याच्या इच्छेने जोयडा तालुक्यातील एका मातेने या क्रुसासमोर मुलाला ठेवून त्याला बरे करण्याची देवाकडे प्रार्थना केली. या मातेची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही. पाहुयात ही कहाणी तिच्याच शब्दांत.

डॉक्टरांनी या मुलाबद्दल आपला अंतिम रिपोर्ट दिलाय. हुबळीतील प्रसिद्ध डॉक्टरकडे जाऊनही काही फायदा झालेला नाही. डॉक्टरांनी केवळ अर्ध्या तासाची शाश्वती देऊन या मुलाला आठवडा लोटलाय. त्याचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरूच आहे. ताप न उतरल्याने तो कोमात गेलाय. सांगेल तितका पैसा खर्च करूनही डॉक्टरांनी विलंब केल्याने आता या मातेने या क्रुसासमोर येऊन देवापुढे आपले गाऱ्हाणं मांडलं आहे. फ्लो

मुलाच्या आजाराची माहिती देताना या मातेने, डॉक्टरांनी त्याच्या मेंदूला ताप चढल्याचे सांगितले. नंतर अर्धांगवायू होऊन त्याच्या अवयवांच्या संवेदना हरपल्या आहेत असे डोळ्यात पाणी आणून सांगितले. मुलाचा जीव वाचावा यासाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. डबडबल्या डोळ्यांनी स्वतःवर आलेल्या प्रसंगाची माहिती देत कुणावरही अशी वेळ येऊ नये अशी अपेक्षा तिने व्यक्त केली आहे. बाईट

एकंदर, करायचे ते सर्व प्रयत्न करून थकलेल्या या असहाय्य मातेने आता मुलाचे प्राण वाचव अशी आर्त साद थेट देवालाच घातली आहे. ती देवाने ऐकून तिच्या पोटच्या गोळ्याला बरे करावे हीच सगळ्यांची अपेक्षा आहे.

 

 

Tags: