Khanapur

खानापूर-हल्ल्याळ मार्गावरील जुने वृक्ष हटविण्याची मागणी

Share

खानापूरहल्ल्याळ राज्य महामार्गावरील करंबळ, कौंदल, लालवाडी, हेब्बाळ आदी ठिकाणी रस्त्याच्या बाजूला असलेले जुनाट वृक्ष धोकादायक बनले असून, ते कधीही कोसळू शकतात. त्यामुळे येथून येजा करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.

आता पावसाळा सुरु झालाय. सोसाट्याच्या वाऱ्याने महामार्गाशेजारील जुनाट वृक्ष कधीही कोसळू शकतात. त्यामुळे ही धोकादायक झाडे हटविण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे. अनेक वेळा जुनाट वृक्ष कोसळून वाहतूक ठप्प झाल्याचे प्रकारही याठिकाणी घडले आहेत.

परंतु वन विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जनतेकडून केला जात आहे.  काही अपघात होण्यापूर्वीच असे जुने व जीर्ण स्थितीतील वृक्ष हटवून संभाव्य दुर्घटना टाळण्याची मागणी केली जात आहे. जर ही जुनी  झाडे पडली तर विजेचे खांबही जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने दक्षता घेऊन जुने वृक्ष हटविण्याची मागणी केली जात आहे.

 

 

 

Tags: