बेळगावातील बीम्स सरकारी नर्सिंग कॉलेजमध्ये विध्यार्थी शपथविधी व दीप प्रज्वलन समारंभ ‘अर्क २०२२‘ उत्साहात पार पडला.

बेळगावातील बीम्स संस्थेच्या आवारात शनिवारी सायंकाळी सरकारी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींचा शपथविधी व दीप प्रज्वलन समारंभ ‘अर्क २०२२’ उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून कर्नाटका स्टेट नर्सिंग कौन्सिलच्या सहायक संचालिका उषा एम. भंडारी, धारवाड येथील डीम्हांसच्या डीन डॉ. आर. श्रीवाणी, बीम्सचे डीन आणि संचालक डॉ. आर. जी. विवेकी, बीम्सच्या प्रशासकीय अधिकारी अफ्रीन बानू बळ्ळारी, बीम्सचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब पाटील, डिस्ट्रिक्ट सर्जन डॉ सुधाकर टी., निवासी वैद्याधिकारी डॉ. पुष्प एम. जी., नर्सिंग अधीक्षक प्रवीण परीट, बीम्स नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य नामदेव माळगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नर्सिंग कॉलेजच्या उप प्राचार्या आयेशा बेगम म्हणाल्या, नर्सिंग विध्यार्थ्यांना त्यांची जबाबदारी आणि व्यवसायाचे पावित्र्य समजावून सांगण्यासाठी आज अर्क-२०२२ या दीप प्रज्वलन आणि शपथविधी समारंभाचे आयोजन केले आहे. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या नर्सिंग स्टाफचे योगदान मोठे आहे. नर्स म्हणून काम करताना मोठा त्याग करावा लागतो. समर्पण भावनेने त्यांना रुग्णांची सुश्रुषा करावी लागते. त्यामुळेच नर्सना करुणा वृत्तीच्या देवदूत मानले जाते असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना प्राचार्य प्रकाश कोडली म्हणाले, कॉलेज जीवनात विध्यार्थ्यानी अभ्यासासोबतच क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमातही भाग घेतला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला मदत होते. कॉलेजतर्फे नर्सिंग विध्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती देऊन २०२१मध्ये कॉलेजचा निकाल १००% लागल्याचे त्यांनी सांगितले. बाईट
यावेळी कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी आणि नर्सिंगचे विध्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


Recent Comments