बेळगावातील कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशकपदी ऍड. सिद्धार्थराजे सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ऍड. सिद्धार्थराजे सावंत यांची बेळगावातील कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऍड. सावंत गेली ८ वर्षे बेळगावात वकिली व्यवसाय करत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. कौटुंबिक न्यायालयाचे न्या. ए. व्ही. श्रीनाथ आणि उच्च न्यायालयाने ही नियुक्ती केली आहे. कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यातील दांपत्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या समुपदेशकांवर असते. समुपदेशनानंतरही दांपत्यात समेट झाला नाही तरच कौटुंबिक न्यायालयात खटला दाखल करून घेतला जातो.


Recent Comments