Vijayapura

सिद्दरामय्यांचा सी. टी. रवींवर पलटवार 

Share

‘सिद्दरामय्यांचे केवळ टिपू सुलतानवर प्रेम आहे’, या भाजप राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांच्या टीकेचा माजी मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी आज चांगलाच समाचार घेतला.

शासकीय पातळीवर कित्तूर राणी चेन्नम्मा, केम्पेगौडा यांच्या जयंती साजरी करण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री असतानाच घेतला होता. सरकारी कार्यालयात बसवण्णा यांचा फोटो लावण्याचा आदेश मीच काढला. म्ह माझे या महापुरुषांवर प्रेम नाही का? हे सगळे त्यांनी केले काय? असा सवाल करत विजापूरच्या महिला विद्यापीठाला अक्कमहादेवींचे नाव कोणी दिले? अक्कमहादेवींचा सन्मान करण्यासाठीच त्यांचे नाव दिले ना?

बसवण्णा यांचा सन्मान करण्यासाठीच त्यांचा फोटो लावण्याचा आदेश मी दिला ना? कित्तूर राणी चेन्नम्मा यांची जयंती शासकीय पातळीवर आधी कोण, तुम्ही सुरु केली का? असा प्रश्न सिद्दरामय्यांनी भाजपला केला. भाजप आणि आरएसएस यांच्याकडून आणखी काय अपेक्षा करणार? असा प्रश्न करून लोकांच्या मनात विष कालवण्याचे काम आरएसएस करत असल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरुच्चार केला.

Tags: