Chikkodi

चिंचणी येथे महालक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात

Share

चिक्कोडी तालुक्यातील चिंचणीची ग्रामदेवता श्रीमहालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या भक्तीभावात पार पडली.

यंदाही करीपौर्णिमेनिम्मित चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावात परंपरेप्रमाणे महालक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात पार पडली. सवाष्णींनी श्री महालक्ष्मी देवीची ओटी भरली. श्री महालक्ष्मीचे हे मंदिर शेतवाडीत असल्याने याला गूजनट्टी श्रीमहालक्ष्मी मंदिर असेही म्हटले जाते. गावातील अनेक शेतकरी कुटुंबे या यात्रोत्सवात सहभागी झाली होती. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसाद पार पडला. याचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. अप्पासाहेब चौगला यांनी ‘आपलीमराठी’ला याबद्दल सविस्तर माहिती दिली .

हा यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी सुदर्शन नाईक, चंद्रकांत हुक्केरी, भीमगौडा चोन्नन्नावर, बाबगौडा जैनापुरे, लक्ष्मण नीलप्पगोळ, मलगौडा धरनगुत्ते आदींनी परिश्रम घेतले.

 

Tags: