खानापूर शहराच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीवरील अक्षरेच गायब झाल्याचे उघड झाले आहे.

होय, बेळगाव-हल्याळ राज्य महामार्गावरील खानापूर शहरातील प्रमुख केंद्र शिवस्मारक चौक आहे. या शिवस्मारकासमोरच खानापूरच्या वेशीत ‘खानापूर शहरात आपले स्वागत’ असा फलक मोठ्या कमानीवर लावण्यात आला होता. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून या स्वागत कमानीवरील अक्षरेच गायब झाली आहेत. त्यामुळे ही कमान रिकामी दिसत आहे. खानापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यानी याकडे दुर्लक्ष केल्यानेच यावरून सिद्ध होत आहे.
या कमानीवर लोखंडी पट्टी लावून त्यावर स्वागताची अक्षरे लावण्यात आली होती. परंतु ती आता गायब झाली आहेत. नगरपंचातीच्या या गैरकारभाराबाबत खानापूरवासियांनी संताप व्यक्त केला आहे. कमानीवर स्वागताच्या मजकुराची अक्षरे पुन्हा लावावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. एकंदर खानापूर नगरपंचायतीचे अधिकारी किमान आमच्या या वृत्तानंतर तरी जागे होऊन यावर कार्यवाही करतील का हे पाहिले पाहिजे.


Recent Comments