Belagavi

ग्राहकपीठासाठी २३ रोजी वकील मुख्यमंत्र्यांना भेटणार

Share

कर्नाटक राज्य ग्राहक आयोगाचे पीठ तातडीने बेळगावात सुरु करावे या मागणीसाठी शुक्रवारीही वकिलांनी आंदोलन सुरूच ठेवले. या संदर्भात २३ जून रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय वकिलांनी घेतला आहे.

होय, बेळगावात सुरु व्हावयाचे कर्नाटक राज्य ग्राहक आयोगाचे पीठ कलबुर्गी येथे कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे बेळगावातील वकीलवर्गात संताप पसरला आहे. बेळगावातच हे पीठ तातडीने सुरु करावे या मागणीसाठी आज शुक्रवारीही वकिलांनी न्यायालयीन कामावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरूच ठेवले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वकिलांचे आंदोलन सुरु आहे. बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके, माजी मंत्री ए. बी. पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी आज आंदोलनस्थळी वकिलांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला.

यावेळी बोलताना आ. अनिल बेनके म्हणाले, मी वकिलांच्या ग्राहक पीठाच्या मागणीसंदर्भात परवाच पालकमंत्री गोविंद कारजोळ, मंत्री उमेश कत्ती, उपसभापती आनंद मामनी यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबत वकिलांसह येत्या २३ जून रोजी शिष्टमंडळ बंगळूरला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करेल. ग्राहक पीठ मंजूर करवून घेऊनच आम्ही परत येऊ असे त्यांनी सांगितले. 

यानंतर बोलताना माजी मंत्री ए. बी. पाटील म्हणाले, एक वकील म्हणून माझा वकिलांच्या लढ्याला संपूर्ण पाठिंबा आहे. कोणतेही सरकार असले तरी आंदोलनाशिवाय काही मिळत नाही. पूर्वी सिद्दरामय्या यांचे सरकार असताना आम्ही सगळ्यांनी संयुक्त लढा दिल्यावरच कर्नाटक प्रशासकीय लवाद बेळगावला मंजूर झाले होते. हातचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हेदेखील सुशिक्षित आहेत. हे काही फार मोठे काम नाही. कलबुर्गीपेक्षा बेळगाव विभाग मोठा आहे. त्यामुळे सगळे मिळून ग्राहक पीठासाठी लढा देऊया असे आवाहन त्यांनी केले. बाईट

एकंदर, बेळगावात ग्राहक पीठ सुरु होण्यासाठी वकिलांनी उपोषण सुरु केले आहे. त्यासाठी २३ जून रोजी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा निर्धारही वकिलांनी केलाय. या भेटीत अंतिम निर्णय काय होतोय ते पहावे लागेल.

 

 

Tags: