बेळगावातील ज्येष्ठ नागरिक सोमनाथ रेडेकर उर्फ अप्पा यांनी वयाची 100 वर्षे पूर्ण करून शतायुषी होण्याचा मान मिळवला आहे. शतकपूर्ती वाढदिवसानिमित्त मराठा सांस्कृतिक भवनात त्यांच्यावर कुटुंबीय, आप्त, मित्र परिवार आणि स्थानिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
होय, बेळगावातील बसवाण गल्ली, शहापूर येथील रहिवासी सोमनाथ गुंडू रेडेकर उर्फ अप्पा यांचा शंभरावा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. सोमनाथ रेडेकर यांचा जन्म 16 जून 1922 रोजी झाला होता. शहापूरातील सरकारी चिंतामणराव हायस्कूलमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्यात ड्राफ्ट्समन म्हणून सेवा बजावून 1977 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. काल, गुरुवारी 16 जून 2022रोजी त्यांनी वयाची 100 वर्षे पूर्ण केली.
यानिमित्त शहापूरातील मराठा सांस्कृतिक भवनात त्यांचा शानदार समारंभात त्यांचा शतकपूर्ती वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर कुटुंबीय, आप्त, मित्र परिवार आणि स्थानिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. याप्रसंगी 100 दीप प्रज्वलित करून सोमनाथ रेडेकर यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी रेडेकर कुटुंबीय, नातेवाईक, आप्त, मित्र परिवार आणि स्थानिक रहिवाशांनी उपस्थित राहून सोमनाथ रेडेकर यांना शुभेच्छा दिल्या.



Recent Comments