बेळगावात निवृत्तीच्या उंबरठ्यावरील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधीक्षकाच्या बेळगावातील घर, कार्यालय आणि मालमत्तांवर एसीबीने आज सकाळी–सकाळी छापा मारल्याने खळबळ उडाली आहे.

होय, बेळगावातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधीक्षक बी. वाय. पवार यांच्या घरावर आणि कार्यालयावर एसीबीच्या २५हुन अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आज शुक्रवारी सकाळी-सकाळीच छापा मारला. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाच हा छापा मारून एसीबी अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. या छाप्यात मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड आढळल्याचे समजते. विशेष म्हणजे, बी. वाय.
+पवार हे याच जून महिन्याच्या ३० तारखेला सेवानिवृत्त होणार आहेत. त्याआधीच एसीबीने हे छापे मारून त्यांना शॉक दिला आहे. बेळगावातील जक्कीनहोंड इंद्रप्रस्थनगर येथील पवार यांच्या घरावर, कार्यालय आणि सरकारी घरावर एकाचवेची छापे मारून कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्याशिवाय निपाणीतील त्यांचे घर, बोरगाव येथील कारखाना मिळून एकूण 6 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे.
या छाप्यात मोठ्या प्रमाणात सोने-चांदीचे दागिने, पैसे सापडल्याचे समजते. जक्कीनहोंड इंद्रप्रस्थनगर येथील पवार यांच्या घरात लाखो रुपयांची बेहिशेबी रोकड आढळून आली आहे. टिळकवाडीतील त्यांच्या घरातील बाथरूममध्येही रोख रक्कम सापडल्याचे समजते. एसीबीचे एसपी बी. एस. न्यामगौडा यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या छापेमारीत बी. वाय. पवार यांच्या घरात आणखी शोधकार्य सुरु आहे.


Recent Comments