Hukkeri

कन्नड गुंडांचा हैदोस; संकेश्वरात मराठी फलक उखडून काढले

Share

सगळे काही सुरळीत सुरु असताना कन्नड गुंडांनी सीमाभागात पुन्हा हैदोस घालण्यास प्रारंभ केला आहे. संकेश्वरात शुक्रवारी कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी मराठी भाषेत लावलेला दिशादर्शक नामफलक जेसीबीने उखडून टाकत आपला कंड शमवून घेतल्याची घटना घडली.

महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने संकेश्वरच्या सीमेवर मराठी भाषेत गावांची नावे लिहिलेला दिशादर्शक फलक उभारला होता. त्यामुळे या भागातील मराठीबरोबरच कानडी भाषिकांचीही सोय होत होती.

मात्र मराठीची कावीळ झालेल्या कन्नड गुंडांनी जेसीबीने हा फलक उखडून टाकला आहे. यावेळी गळ्यात लालपिवळे फडके घालून फार मोठा पराक्रम केल्याच्या अविर्भावात पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Tags: