बालकामगार प्रथा समाजाला लागलेला कलंक आहे. तो पुसण्यासाठी व्यावसायिकांनी एकही बालकामगार कामावर ठेवू नये असे आवाहन हुक्केरीचे दिवाणी न्यायाधीश के. एस. रोट्टेर यांनी केले.

हुक्केरीत बुधवारी कामगार खात्यातर्फे बालकामगार प्रथांविरोधी दिन पाळण्यात आला. यानिमित्त काढलेल्या जनजागृती जथ्याला न्या. के. एस. रोट्टेर यांनी चालना दिली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना के. एस. रोट्टेर म्हणाले, बालकामगार प्रथा बंद पाडण्यासाठी समाजाचे, खास करून व्यावसायिकांचे सहकार्य आवश्यक आहे. दुकानदार, व्यावसायिक, उद्योजकांनी मुलांना कामावर ठेवल्यास मुलांची मानसिक व शारीरिक वाढ कुंठित होऊन त्यांचा विकासाला अडसर निर्माण होतो. याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी कामगार खात्यातर्फे जथा काढल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कामगार खात्याच्या बेळगाव येथील योजना संचालिका ज्योती कांते, सहाय्यक शिशुविकास अधिकारी एन. एस. नागलोटी, डॉ. एच. होळेप्पा, हुक्केरी वकील संघटनेचे अध्यक्ष आर. पी. चौगला, सचिव एम. के. पाटील, भीमसेन बागी, डी. के. आवरगोळ, शांतला शिलेन्नावरमठ, अनिता कुलकर्णी, एम. एम. पाटील, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments