बेळगावातील बबन भोबे मित्रमंडळातर्फे केळकर बागेतील ३ नं. कन्नड शाळेच्या विध्यार्थी आणि १० दिव्यांगांना छत्र्या आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

आपल्या परीने समाजसेवा करून गरजूना मदत करण्याचे व्रत बेळगावातील बबन भोबे मित्रमंडळाने जोपासले आहे. मंडळातर्फे केळकर बागेतील ३ नं. कन्नड शाळेच्या विध्यार्थ्यांना आणि शारीरिक अपंग संस्था शहापूर येथील १० दिव्यांगांना छत्र्या आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. टॉप इन टाऊनचे मालक राहुल शहापूरकर व अंगणवाडी कर्मचारी नेत्या मंदा नेवगी यांच्याहस्ते ही मदत देण्यात आली. ‘
मंगेश होंडा’चे संचालक रोहित देशपांडे यांनी हे साहित्य पुरस्कृत केले आहे. त्याचप्रमाणे गोंधळी गल्लीतील डॉ. संतोष भोबे यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त शहरातील विविध आश्रमांना अन्नदान करण्यात आले. या प्रसंगी ओंकार गावडे, नितीन कुलकर्णी, बाबा बडोदेकर, शारीरिक अपंग संस्था शहापूरचे अध्यक्ष वामन कट्टी आदी उपस्थित होते. साहित्य पुरस्कृत केल्याबद्दल ‘मंगेश होंडा’चे संचालक रोहित देशपांडे यांचे बबन भोबे यांनी आभार मानले.


Recent Comments