बागलकोट जिल्ह्यातील इलकल येथील बूथ क्र. 101मधील शिक्षक मतदारसंघातील मतपेटीत ५ मतपत्रिका जादा आढळल्याने अपक्ष उमेदवार एन. बी. बन्नूर यांनी संताप व्यक्त केला आहे.

होय, बागलकोट जिल्ह्यातील इलकल येथील बूथ क्र. 101मधील शिक्षक मतदारसंघातील मतपेटीत 5 मतपत्रिका जादा आढळून आली. मतदार संख्या पाहता या केंद्राच्या मतपेटीत 171 मते असायला हवी होती. मात्र 5 मते अधिक आढळून आल्याने अपक्ष उमेदवार एन. बी. बन्नूर यांनी त्याला आक्षेप घेतला. मतदान केंदावरील निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी बन्नूर यांनी केली. यावरून काही गोंधळ झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही. मतमोजणीला विरोध करावा लागेल. कदाचित प्रिसायडिंग अधिकाऱ्यांनी आकडेवारी लिहिताना चूक केली असू शकते. हे कोणी मुद्दाम केली असे म्हणता येत नाही. काही ठिकाणी 4, 5 मते कमी-जादा होतात. पण आम्ही सगळ्या उमेदवारांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. याबाबत आकडेवारी काढली आहे. या मतपत्रिका वेगळ्या करू असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. परंतु त्या कशा पद्धतीने वेगळ्या करतात हे पाहिले पाहिजे असे बन्नूर यांनी सांगितले.


Recent Comments