वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी बेळगावातील ज्योती कॉलेजमध्ये आज सकाळी सुरु झाली आहे. मतमोजणीसाठी कॉलेज परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, ओळखपत्राशिवाय मोजणी केंद्रात आलेल्या भाजप उमेदवार हनुमंत निरानी यांच्या पीएला जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी फैलावर घेतल्याची घटना घडली.

कडेकोट पोलीस बंदोबस्तात बेळगावात ज्योती कॉलेजमध्ये बुधवारी सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर क्लब रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, ओळखपत्र नसताना मतमोजणी केंद्रात प्रवेश केल्याने पदवीधर मतदार संघातील भाजप उमेदवार हनुमंत निरानी यांचे पीए सुरेश याना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी चांगलेच फैलावर घेतले. ओळख व प्रवेशपत्र नसताना त्यांनी केंद्रात प्रवेश केल्याने जेडीएसच्या एजंटांनी आक्षेप घेतला.
याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सुरेश यांना धारेवर धरले. तसेच सुरेश यांना केंद्राबाहेर काढण्याची सूचना पोलिसांना केली. यानंतर याबाबत निवडणूक अधिकारी प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांच्याकडे याबाबत तक्रार करण्यात आली. ओळखपत्राशिवाय सुरेश याना केंद्रात प्रवेश दिलाच कसा असे विचारून बिस्वास यांनी बंदोबस्तावरील पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना धारेवर धरले.


Recent Comments