Belagavi

मतमोजणी केंद्र बंदोबस्तावरील पोलीस अत्यवस्थ

Share

मतमोजणी केंद्रावर बंदोबस्तासाठी नेमलेला केएसआरपीचा पोलीस हवालदार अत्यवस्थ झाल्याची घटना बेळगावात आज सकाळी घडली. त्याला तातडीने उपचारांसाठी जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले.

होय, बेळगावात क्लब रोडवरील ज्योती महाविद्यालयात वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी आज बुधवारी करण्यात आली. यावेळी बंदोबस्तासाठी नेमलेले केएसआरपीचे पोलीस हवालदार बी. जी. कापसे अचानक अत्यवस्थ झाले.

हे पाहून त्यांच्या सहकाऱ्यांनी वरिष्ठांना कळवून ऍम्ब्युलन्स मागवली. या ऍम्ब्युलन्समधून कापसे यांना त्वरित इस्पितळात दाखल करण्यात आले.

 

 

Tags: