Vijayapura

One arrested for chain snatching : महिलेचे मंगळसूत्र पळवणाऱ्याला पकडले

Share

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळणाऱ्या तिघांपैकी एकाला पोलीस आणि जमावाने पाठलाग करून पकडल्याची घटना विजापुरात घडली.

विजापूर येथील रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या भीमाबाई इरप्पा दिमंतगी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र एका भामट्याने हिसकावून घेत पळ काढला. त्याच्यासोबत आणखी दोघे होते. तिने आरडाओरड केल्याने उपस्थित नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यामुळे पळणाऱ्या त्रिकुटाचा पोलीस आणि जमावाने पाठलाग करून एकाला पकडले.

तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. सुदीप सिद्धप्पा कांबळे असे पकडलेल्या चेन स्नॅचरचे नाव आहे. पळून गेलेल्या त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी विजापूर रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.

 

 

Tags: