बेळगावातील कॅम्प येथील सेंट अँथनी चर्च येथे सोमवारी सायंकाळी सेंट अँथनी फेस्त संपन्न झाले. थाटामाटात आणि शांततेत हे फेस्त साजरे करण्यात आले.

बेळगाव व इतर ठिकाणाहून मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होऊन संतांचे आशीर्वाद घेतले. विशेष प्रार्थना करून भक्तांनी सेंट अँथनी यांच्याकडे त्यांचे नवसदेखील पूर्ण केले.

सिंधुदुर्गचे बिशप रेव्हरंड ऑल्विन बॅरेटो यांनी भाविकांनी फक्त नवसासाठी नव्हे तर त्यांच्या शिकवणी आणि पद्धतींचे पालन करण्याचे आवाहन केले.“प्रत्येकवेळी तुम्ही कृपा मागू नका, तर सेंट अँथनीप्रमाणे समाजातील गरजू आणि गरीब लोकांपर्यंत पोहोचा. तसेच त्याच्या गुणांचे आणि शास्त्रांचे अनुकरण करा,” असे बिशप बॅरेटो यांनी सांगितले. आंधळेपणाने पाळल्या जाणाऱ्या महान संतांबद्दलचे गैरसमज आणि कालबाह्य प्रथांवर त्यांनी कडाडून टीका केली.
बेळगावचे बिशप रेव्हरंड डेरेक फर्नांडिस, फादर विजय मेंडिथ, फादर फिलीप कुट्टी, फादर, नन्स आणि भाविकांनी फेस्ताच्या प्रार्थनेत भाग घेतला.पॅरिश प्रीश्ट फादर विजय मेंडिथ यांनी सेंट अँथनीच्या आशीर्वादाने कित्येक भाविकांचे चांगले झाल्याची माहिती दिली. कोविड-19 निर्बंधांच्या कालावधीनंतर, दोन वर्षांनी हे फेस्त मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.


Recent Comments