अरुण शहापूर यांनी गेल्या 12 वर्षात केलेले अप्रतिम कार्य, शिक्षकांच्या त्यांनी सोडवलेल्या समस्या, शिक्षकांप्रती त्यांची तळमळ यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. त्यामुळेच विरोधी उमेदवार पैसे वाटत सुटले आहेत असा आरोप आ. अनिल बेनके यांनी प्रकाश हुक्केरी यांच्यावर केला.

बेळगावात विश्वेश्वरय्या नगरातील मतदान केंद्राजवळ सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. अनिल बेनके म्हणाले, भाजपच्या विजयासाठी चांगले वातावरण आहे. मतदार उत्साहाने मतदान करत आहेत. मात्र विरोधी पक्ष वाममार्गाने मतदारांना आमिष दाखवत आहे ही खेदाची बाब आहे. पण शिक्षक याला बधणार नाहीत याची खात्री आहे. काँग्रेस उमेदवाराने मतदारांत पैसे वाटल्याचे प्रसारमाध्यमांत आले आहे. याबाबत आम्ही तक्रार दिली आहे. विजापुरात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे असे आ. बेनके यांनी सांगितले.
या. बेनके पुढे म्हणाले, आम्ही कोणाला एक रुपयाही दिलेला नाही. घड्याळ वगैरे देण्याचा प्रश्नच येत नाही. आमचे सगळे मतदार आम्हला मते देणार आहेत. आमचा झंझावात मोठा आहे. सगळ्या निवडणुका आम्ही गांभीर्याने घेतो. सगळ्या खेड्यातील मतदान येथे असल्याने मतदान केंद्रांना भेट देत आहे असे त्यांनी सांगितले.
एका मताला १० हजार रुपये काँग्रेस वाटतेय अशी चर्चा आहे. शिक्षकांना पैसे देणे चुकीचे आहे. असे प्रकार घडू नयेत. हे चांगले नाही. अरुण शहापूर यांना भिऊन काँग्रेस उमेदवार अशाप्रकारे पैसे वाटत सुटले आहेत असा आरोप आ. अनिल बेनके यांनी यावेळी केला.
दरम्यान, मरदाराना पैसे वाटपासंदर्भात पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, आमच्याकडे याबाबत काल काही तक्रारी आल्या होत्या. याबाबत आमच्या अधिकाऱ्यांच्या पथकांनी मोहीम राबवली. परंतु कोठेही पैसे किंवा घड्याळे वाटल्याचे प्रकरण समोर आलेले नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
एकंदर पैसे वाटपावरून अनेक भाजप नेत्यांनी काँग्रेस उमेदवार प्रकाश हुक्केरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याला प्रकाश हुक्केरी आता कसे उत्तर देतात हे पहावे लागेल.


Recent Comments