बेळगावात वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना उत्तरचे भाजपचे आ. अनिल बेनके यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची घटना घडली.

होय, बेळगावातील विश्वेश्वरय्या नगरातील सरकारी शाळेतील मतदान केंद्रावर आ. अनिल बेनके यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची घटना आज, सोमवारी सकाळी घडली. आ. बेनके यांनी केंद्राला भेट दिली त्यावेळी त्यांनी २ बुथवर जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्या तोंडावर मास्क नव्हता.
त्यानंतर त्यांनी मोबाईलवरून कोणाशीतरी चर्चा केली. स्थानिक नगरसेवक श्रेयस व समर्थकांसह त्यांनी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. अशाप्रकारचे वर्तन निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरले आहे. 
केवळ मतदारांनाच मास्क बंधनकारक आणि मोबाईल बंदी आहे का? असे परष आता उपस्थित होत आहेत. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अशाप्रकारे मतदान केंद्राला कोणाला भेट देता येत नाही. आमदारांनी विश्वेश्वरय्या नगरातील मतदान केंद्राला भेट दिल्याची माहिती आहे. त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. याबाबत अहवाल देण्याचे निर्देश निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत लेखी तक्रार देण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. आज अधिकारी तक्रार देणार आहेत असे त्यांनी सांगितले.
एक जबाबदार आमदार असूनही अनिल बेनके यांनी निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे. आता जिल्हा प्रशासन त्यांच्याविरोधात काय कारवाई करणार हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.
पॉलिटिकल ब्युरो, आपली मराठी, बेळगाव


Recent Comments