Belagavi

DC PUT DESK FOR VOTERS : मतदारांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः डेस्क आणले

Share

वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी बेळगाव शहरात आज सकाळी मतदानाला प्रारंभ झाला. विश्वेश्वरय्या नगरातील मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्वतः मतदारांसाठी डेस्क घालून दिल्याची घटना घडली.

होय, बेळगावातील विश्वेश्वरय्या नगरातील सरकारी शाळेत स्थापन केलेल्या मतदान केंद्रावर शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी मतदान घेण्यात येत आहे. या ठिकाणी मतदार रांगेत उभे राहून मतदान करीत होते. त्यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली.

यावेळी मतदारांना बसण्यासाठी अडचण होत होती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मतदारांना बसण्यासाठी आसनव्यवस्था करण्याची सूचना केली. एवढ्यावरच न थांबता, स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या वर्गातील डेस्क आणून मतदारांच्या बसण्याची सोय केली. मतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या कार्याचे कौतुक केले.

Tags: