Vijayapura

विजापुरात विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाला प्रारंभ

Share

वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील विधान परिषद निवडणुकीसाठी विजापुरात मतदानाला प्रारंभ झाला आहे.

विजापूर शहरातील गांधी चौकातील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात मतदान प्रक्रियेला आज, सोमवारी सकाळी ८ वाजता प्रारंभ झाला. या केंद्रात शिक्षक आणि पदवीधर या दोन्ही मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येत आहे. शिक्षक मतदार संघातील जेडीएसचे उमेदवार चंद्रशेखर लोणी यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला. सध्या काहीशा संथ गतीने मतदान सुरु आहे.

Tags: