Vijayapura

विजापुरात बालकामगार पद्धत विरोधी दिन

Share

जागतिक बालकामगार पद्धत विरोधी दिनानिमित्त विजापूर येथे आज जागृती जथा काढण्यात आला.

जागतिक बालकामगार पद्धत विरोधी दिनानिमित्त विजापूर येथे जिल्हा प्रशासन, विजापूर वकील संघटना आणि विविध सरकारी खात्यांकडून जागृती जथ्याचे आयोजन केले होते.

विजापुरातील गांधी चौकातील सरकारी पदवीपूर्व कॉलेजच्या आवारात मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. जे. कुरुदत्ती यांनी जागृती जथ्याला चालना दिली. गांधी चौकातून आंबेडकर सर्कलसह विविध मार्गावरून हा जथा काढण्यात आला. यातून बालकामगार पद्धतीविरोधात जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाधिकारी विजयमहांतेश दानम्मनवर यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: