वायव्य शिक्षक मतदार संघातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिक्कोडीतील ब्लॉक काँग्रेस कार्यालयाच्या आवारात ओली पार्टी रंगल्याची घटना घडली आहे.

चिक्कोडीतील ब्लॉक काँग्रेस कार्यालयाच्या आवारात उमेदवाराने समर्थकांसाठी जबरदस्त ओली पार्टी दिली. यावेळी कार्यालयाच्या फलकावर कपडा बांधून फलक लपवण्यात आला होता. असंख्य शिक्षकांना बोलावून काँग्रेस उमेदवार प्रकाश हुक्केरी यांनी त्यांना आमिष दाखविले. आश्चर्य म्हणजे निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे बेधडक उल्लंघन होऊन देखील चिक्कोडी तालुका प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली.

प्रकाश हुक्केरी यांच्या प्रभावामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रांताधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्लॉक काँग्रेस कार्यालयात ही ओली पार्टी रंगली. तरीदेखील अधिकाऱ्यांनी त्याकडे काणाडोळा केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.


Recent Comments