अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा दोघांच्या मदतीने पत्नीने खून केल्याची घटना विजापुरातील साई पार्कजवळ घडली आहे. या खून प्रकरणी संबंधित महिलेसह दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

व्हॉईस : राजेश्वरी हळ्ळी, रवी तळवार आणि गुरप्पा दळवाई अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. साई पार्कजवळ राहणाऱ्या राजेश्वरी हळ्ळी हिचे एकाशी अनैतिक संबंध होते.
त्याला तिचा पती प्रकाश हळ्ळी याचा विरोध होता. त्यामुळे अनैतिक संबंधात अडसर ठरणार पती प्रकाश याचा राजेश्वरीने रवी तळवार आणि गुरप्पा दळवाई यांच्या मदतीने खून केला होता. पोलीस तपासात ही बाब पुढे आल्यावर पोलिसांनी या तिघांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी जलनगर पोलीस ठाण्यात जिन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


Recent Comments