वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात भाजप उमेदवारांच्या विजयासाठी गोकाक, हुक्केरी आणि अथणीमध्ये सावकारांनी मिळून काम केले आहे असे सांगत आ. भालचंद्र जारकीहोळी यांनी ऐक्याचा मंत्र जपला आहे.

वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी शनिवारी बेळगावात प्रचार करताना प्रसारमाध्यमांशी बोलताना केएमएफ अध्यक्ष आ. भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.
आमच्या दोन उमेदवारांचा विजय निश्चित आहे. निवडणूक म्हटली की, छोटी-मोठी नाराजी असणे स्वाभाविक आहे. हनुमंत निरानी, अरुण शहापूर यांच्या मतदार संघात ३३ विधानसभा मतदार संघ येतात. गोकाक, हुक्केरी, अथणीत सगळ्या सावकारांनी मिळून काम केले आहे. लखन जारकीहोळी यांच्या पाठिंब्याविषयी जाहीर चर्चा नको. त्याबाबत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील. त्यामुळे या विषयी जाहीर चर्चा नको असे ते म्हणाले.
जिल्हा भाजपात एकवाक्यता नसल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याबाबत बोलताना आ. भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, यापूर्वी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली बेळगावात सभा घेण्यात आली आहे. आता विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप नेते एकीचा मंत्र जपत आहेत. पाहू पुढे काय होते ते असे ते म्हणाले.


Recent Comments