बेळगाव शहर परिसराला शुक्रवारी सायंकाळी जोरदार पावसाने झोडपले. पावसामुळे काही ठिकाणी झाडे पडून वाहतुकीत व्यत्यय आला. बेळगाव–वेंगुर्ला मार्गावर हिंडलगा गणपती मंदिराजवळ रात्री ८ च्या सुमारास झाड कोसळल्याने बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती.

होय, बेळगाव शहरात काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला. सुमारे २ तास पावसाने शहरी-परिसराला चांगले झोडपले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तशातच काही ठिकाणी झाडे कोसळल्याने आवाहतूक खोळंबल्याची घटना घडली. बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर हिंडलगा गणपती मंदिराजवळ रात्री ८ च्या सुमारास झाड कोसळल्याने बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याशेजारील वीजवाहिन्यांवर हे झाड कोसळून रस्त्यावर पडल्याने संपूर्ण रस्ता ब्लॉक झाला.
त्यामुळे हिंडलग्याहून बेळगावच्या दिशेने आणि बेळगावहून हिंडलग्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची भली मोठी रांग दुतर्फा लागली. त्यामुळे मोठा ट्रॅफिक जॅम निर्माण झाला. याची माहिती मिळताच वाहतूक पोलिस निरीक्षक मंजुनाथ नायक यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन झाड हटविण्याची व्यवस्था केली. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष समाजसेवक साजिद शेख यांना बोलावण्यात आले.
साजिद शेख यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी येऊन ट्री कटरच्या मदतीने झाडाच्या फांद्या तोडून संपूर्ण झाड रस्त्यातून हटविले. त्यानंतर काही वेळातच वाहतूक सुरळीत सुरु झाली.


Recent Comments