वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची सभा पार पडली. भाजपच्या आघाडीच्या नेत्यांनी या सभेला हजेरी लावली.

राज्य विधान परिषदेच्या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची सभा पार पडली. भाजपच्या आघाडीच्या नेत्यांची या सभेला उपस्थिती होती. मंत्री उमेश कत्ती यांच्या युके २७ हॉटेलमध्ये झालेल्या या सभेला जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, माजी उपमुख्यमंत्री व एमएलसी लक्ष्मण सवदी, खा. मंगल अंगडी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, आमदार पी. राजीव, अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित होते.
यावेळी विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा संकल्प करण्यात आला. फ्लो सभेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, गेले १०-१२ दिवस पक्षनेते प्रचारात गुंतले होते. त्यांच्याकडून सर्व तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्याचप्रमाणे विजापूर, बागलकोट जिल्ह्यातील वातावरणाचीही माहिती घेतली आहे. लोकांची प्रतिक्रिया पाहता भाजपचे अरुण शहापूर, हनुमंत निरानी यांचा विजय निश्चित आहे. प्रचंड बहुमताने ते निवडून येतील यात शंका नाही. जास्त मतदान होण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. सर्व जाती-धर्माच्या, सर्व जिल्ह्यातील मतदारांनी आम्हाला पाठिंबा व्यक्त केला आहे. बेळगाव, विजापूर, बागलकोट या तिन्हीजिल्ह्यातील सर्व संस्थांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. मतदारांनी वैयक्तिकरित्या आणि संघ-संस्थांनी पाठिंबा दिला आहे.
निवडणूक निकालादिवशी आमची स्ट्रॅटेजी कळेल असे बोम्मई यांनी आत्मविश्वासाने सांगितले. बाईट भाजपमद्ये मतभेद असल्याबाबतच्या प्रश्नावर आमच्यात कसलेही मतभेद नाहीत असे मुख्यमंत्र्यानी स्पष्ट केले. वायव्य शिक्षक मतदार संघात कडवी लढत होणार का या प्रश्नावर कडवी, जटिल लढत वगैरे काही नाही. आधी काही अडचणी होत्या हे खरे, मात्र १२ दिवसांच्या प्रचारकाळात बहुसंख्य शिक्षण संस्था, शिक्षक संघांनी आम्हाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. गेल्यावेळेपेक्षाही विक्रमी मतांनी अरुण शहापूर विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री बोम्मई यांनी व्यक्त केला. बाईट एकंदर विधान परिषद निवडणूक जिंकायचीच असा निर्धार करून भाजपने रणतंत्र आखले आहे. त्यात त्यांना कितपत यश येते हे निकालादिवशीच कळेल.


Recent Comments