Vijayapura

Four arrested in double murder case : डबल मर्डर प्रकरणी सिंदगीत चौघांना अटक

Share

 पतीपत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या चौघा आरोपीना सिंदगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

होय, विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथे ६ जून रोजी पती-पत्नीची निर्घृण हत्या झाल्याने एकच खळबळ माजली होती. राजश्री यरगल, नानागौडा यरगल हे आपल्या मुलांचे ट्रान्सफर सर्टिफिकेट आणण्यासाठी जात असताना आरोपी शंकरगौडा बिरादार याने आपल्या सहकाऱ्यांसह त्यांचा खून करून फरारी झाले होते.

सिंदगी पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी जाळे विणले होते. या प्रकरणी पोलिसांनी शंकरगौडा बिरादार यांच्यासह अप्पासाहेब बिरादार, संगण्णा बिरादार आणि मंजुनाथ बिरादार या आरोपींना अटक केली आहे. सिंदगी पीएसआय निंगाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी सिंदगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Tags: