Accident

KSRTC bus collides with college bus: Over 20 injured केएसआरटीसी बसची कॉलेज बसला धडक; २० जखमी, दोघे गंभीर

Share

केएसआरटीसीच्या बसने कॉलेज बसला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात विद्यार्थ्यांसह २० जण जखमी झाले. हा अपघात आज सकाळी मुडलगी तालुक्यातील गुर्लापूर गावाजवळ झाला

जत-जांबोटी राज्य महामार्गावरील गुर्लापूर गावाजवळ आज सकाळी केएसआरटीसी बस आणि कॉलेज बसमध्ये अपघात झाला. केएसआरटीसी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. त्याच्या बसने मुडलगीतील खासगी कॉलेजच्या बसला मागून धडक दिल्याने कॉलेजला जाणारे बसमधील १० आणि केएसआरटीसी बसमधील १० हुन अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. दोघं जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

विध्यार्थ्यांना घेण्यासाठी थांब्यावर थांबलेल्या कॉलेज बसला केएसआरटीसी बसने मागून धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. मुडलगी पोलिसांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी मुडलगी पोलिस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

 

Tags: