हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी येथील विरक्तमठाला राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी भेट देऊन श्री काशिनाथ महास्वामीजी आणि श्री प्रभुलिंग स्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी बोलताना राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी म्हणाले, श्री काशिनाथ महास्वामीजींनी समाजात धार्मिक सुधारणा घडवून अलौकिक कार्य केले आहे. समाजातील नागरिकांसाठी ते आदर्श ठरले आहेत. 
यावेळी घटप्रभाचे विरुपाक्ष देवरु, राजू कत्ती, सुरेश पाटील, गुरुबसय्या कर्पूरमठ, महांतेश उदगट्टीमठ, महानंद भुशी, अज्जाप्पा कुरणे, बसवराज प्याटी, राचय्या हिरेमठ, संतोष भुशी, अरुण राजन्नावर आदी उपस्थित होते.


Recent Comments