Crime

TEACHER BEATEN BY VILLAGERS FOR UPLOADING PORN PHOTOS : विध्यार्थिनीशी संबंध ठेवून फोटो व्हायरल; ग्रामस्थांकडून मास्तरची धुलाई

Share

विद्यार्थिनीचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या मास्तराला गावकर्यांनी चोप दिल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील यक्कुण्डी गावात उघडकीस आली आहे.

यक्कुण्डी गावातील हायस्कूलचा शारीरिक शिक्षक महेश शिवलिंगप्पा बिरादार याने शाळेतील एका विद्यार्थिनीला विवाहाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे.

त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवतानाच्या प्रसंगांचे आपल्या मोबाईलमध्ये व्हीडिओ काढले होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर या युवतीचे दुसऱ्या युवकाशी लग्न ठरले. ते लग्न मोडण्यासाठी महेश बिरादारने व्हीडिओ एडिट करून आपला चेहरा काढून विद्यार्थिनीचे अश्लील फोटो आपल्या स्टेट्सवर ठेवले. हे फोटो व्हायरल होताच चिडलेल्या ग्रामस्थांनी संतापून शाळेत येऊन महेश बिरादारला चांगला चोप दिला.

 

मास्तरची ग्रामस्थांनी धुलाई करतानाचा हा व्हीडिओ आता समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.शारीरिक शिक्षक मूळचा विजापूर जिल्ह्यातील देवरहिप्परगी तालुक्यातील बैरवाड गावचा रहिवासी आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात सौंदत्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आपल्याच विध्यार्थिनीशी एका शिक्षकाने शारीरिक संबंध ठेवून त्याचे फोटोही व्हायरल करणे कितपत योग्य आहे असा सवाल या निमित्ताने उदभवला आहे.

 

Tags: