Belagavi

गोव्यात १२ ते १८ जूनपर्यंत दहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन

Share

गोव्यात १२ जून ते १८ जून या कालावधीत दहावे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होणार आहे अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे मनोज खाडे यांनी दिली.

बेळगावात बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना मनोज खाडे म्हणाले, गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय हिंदू अधिवेशनात देशातील ३५० हुन अधिक हिंदू संघटना आणि एक हजाराहून अधिक हिंदू प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. गेल्या १० वर्षांपासून सुरु असलेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनातून हिंदू राष्ट्राची चर्चा सुरू होती. हिंदू राष्ट्राच्या ध्येयाने विविध क्षेत्रात कामाला सुरुवात झाली आहे. या दहाव्या अधिवेशनात हिंदू राष्ट्राची आदर्श स्थिती काय असावी आणि हिंदू राष्ट्राचे कामकाज काय असावे यावर हिंदू राष्ट्राची संसद आयोजित करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

अधिवेशनातील हिंदू संसदेत हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी संसदीय आणि घटनात्मक मार्ग, देवस्थानांचा जीर्णोद्धार आणि हिंदू शैक्षणिक धोरण कसे अवलंबावे यावर मान्यवर तज्ज्ञांची चर्चा आयोजित केली आहे. गोव्यातील फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थानात हे दहावे राष्ट्रीय हिंदू अधिवेशन होणार आहे असे खाडे यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला बापू सावंत, व्यंकटेश शिंदे, तारा शेट्टी, विजयानंद गडकर आदी उपस्थित होते.

Tags: